आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bjp shivsena Meeting For Seat Sharing Issue At Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युतीवर शिक्कामोर्तब, महायुतीचे काय? सेना 150, भाजप 124, घटकपक्षांना 14 जागा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- मुंबईत भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात भाजप-शिवसेना नेत्यांची बैठक आज दुपारी पार पडली)
मुंबई- शिवसेना व भाजपच्या युतीवर अखेर आज शिक्कामोर्तब झाले. भाजप व शिवसेना नेत्यांत आज दुपारी 12 वाजता मुंबईत भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर भाजप-शिवसेनेची युती अभेद्य असल्याची घोषणा विनोद तावडे व संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, या बैठकीला महायुतीतील मित्रपक्षांना न बोलावल्यामुळे ते नाराज झाले आहेत. योग्य जागा न मिळाल्यास महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा राजू शेट्टी व महादेव जानकर यांनी दिला आहे.
युतीतील सूत्रांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीत शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला नवा प्रस्ताव दिला. त्यानुसार शिवसेना 150, भाजप 124 तर उर्वरित चार घटकपक्षांना 14 जागा देण्यावर या दोन्ही पक्षांत एकमत झाले. याबाबतची माहिती सायंकाळी मित्रपक्षांतील नेत्यांना दिली जाणार आहे. त्यांच्याकडून संमती मिळाली की महायुतीतील जागावाटपाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. भाजप-सेनेतील वाद आता संपला असल्याचे दिसत असले तरी महायुतीतील इतर घटकपक्ष नक्कीच नाराज होणार आहेत. चार घटकपक्षांना मिळून केवळ 14 मिळणार असल्याचे पुढे येत असल्याने काही घटकपक्ष महायुतीतून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या 25 वर्षापासून युती टिकविण्यासाठी शिवसेना- भाजपच्या नेत्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून आज पुन्हा एकदा चर्चा करण्याचा निर्णय घेतला. यात शिवसेनेकडून खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, सुभाष देसाई, तर भाजपकडून ओम माथूर, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आदी नेते उपस्थित होते.
या बैठकीची माहिती देताना तावडे म्हणाले, भाजप आणि शिवसेना या पक्षाची युती राहावी अशी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भूमिका होती व आहे. जागावाटपांबाबत वेगवेगळे फॉर्म्यूले चर्चेदरम्यान येत असतात. त्यावर चर्चा होते काही पसंत पडतात काही पसंत पडत नाहीत. मात्र, यावरून युती तुटेल असे कोणी समजण्याचे कारण आहे. शिवसेनेने भाजपला आज एक नविन प्रस्ताव दिला आहे. त्यावर आमच्या दोन्ही पक्षांची सहमती आहे. मात्र याची माहिती घटकपक्षांतील नेत्यांना देण्यात येणार आहे. आज सायंकाळी याबाबत महायुतीतील सर्व घटकपक्षांशी चर्चा करून अधिकृत घोषणा होऊ शकते. संजय राऊतांनी सांगितले की, बाहेर मिडियांनी काहीही बातम्या देऊ देत भाजप व शिवसेनेची मागील 25 वर्षापासूनची युती कायम राहणार आहे.
महायुतीला घरघर, शेट्टी-जानकर युतीतून बाहेर पडणार?...वाचा पुढे...