आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वसई-विरार महापालिकेसाठी युती! सेना 75 तर भाजप 40 जागा लढविणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती एकत्र लढणार असल्याची घोषणा शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि भाजपचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली आहे. बुधवारी दिवसभर मंत्रालयात झालेल्या शिवसेना-भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर व काथ्याकुट केल्यानंतर हा निर्णय झाला.
वसई-विरार महानगरपालिकेत एकूण 115 जागा असून, या निवडणुकीत शिवसेना 75 तर भाजप 40 जागा लढविणार आहे. बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूरांचे एकतर्फी वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजप-शिवसेना एकत्र आले आहेत. महापालिकेची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक आहे. 2010 साली वसई-विरारला महानगरपालिकेचा दर्जा दिल्यानंतर झालेल्या निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला व लोकहितवादी पार्टीला मतदारांनी पसंती दिली होती. गेल्या वेळी 89 जागांसाठी निवडणूक झाली होती. यंदा त्यामध्ये 26 जागांची वाढ झाली असून आता 115 नगरसेवक निवडून जातील. त्यामुळे शिवसेनेने कंबर खसली आहे. यासाठीच सेनेने भाजपची साथ घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्याला कल्पना असेलच की, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची लाट असतानाही वसई-विरार पट्ट्यात हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे तीन आमदार निवडून आले होते. त्यामुळे महापालिका निवडणूकही भाजप-शिवसेनेला जड जाणार हे ओळखून दोन्ही पक्षांनी सामस्यजाची भूमिका घेत युतीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा शिवसेना उपनेते अनंत तरे आणि भाजप खासदार कपिल पाटील यांनी सर्व 115 जागांवरील युतीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
बातम्या आणखी आहेत...