आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे, भाजप, शिवसेनेचेही शिवाजी पार्कात सेल्फी पॉइंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवाजी पार्कमधील “सेल्फी पॉइंट’वरून उदभवलेल्या वादावर मुंबई महापालिकेने तोडगा काढला आहे. भारतीय जनता पक्षासोबतच आता शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही याठिकाणी शिवाजी पार्कमध्ये सेल्फी पॉइंटसाठी जागा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

सुमारे ५० फुटांच्या अंतरावर या तिन्ही पक्षांचे स्वतंत्र सेल्फी पॉइंट असतील. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी सेल्फी पॉइंट ही संकल्पना आणली होती. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी पराभूत झाल्याने तसेच या सेल्फी पॉइंटच्या देखभालीचा खर्च शक्य नसल्याचे कारण देत त्यांनी तो बंद केला होता. त्यानंतर शिवसेना आणि भाजपने हा पॉइंट पुन्हा सुरू करण्याची तयारी दाखवल्यामुळे मनसेनेही घूमजाव करत हा पॉइंट आपणच चालवणार असल्याचा आग्रह धरला. 

यातून तिन्ही पक्षांदरम्यान वाद निर्माण झाला होता. दरम्यान, पालिकेने भाजपला याठिकाणी पॉइंट उभारण्यास परवानगी दिल्यानंतर देशपांडेंनी परवानगीसाठी पालिकेत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. शेवटी वाद वाढत असल्याचे पाहून पालिकेने तिन्ही पक्षांना परवानगी देऊन टाकली.
 
बातम्या आणखी आहेत...