आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या जाहिरातींवर 500 कोटी रुपये खर्च, तक्रार दाखल करणार: राष्ट्रवादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून खर्चाची मर्यादा  ठरवून दिली असताना भाजपने मात्र तब्बल ५०० कोटी रुपयांचा केला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी दिली.   
 
भाजप पैशांच्या बळावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. एका पक्षाला मुंबईतील २२७ उमेदवारांसाठी २२ कोटी ७० लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा असताना भाजपकडून मात्र तब्बल ५०० कोटी खर्च करण्यात आला. हा खर्च भाजपच्या उमेदवारांवर सम-समान लादून योग्य ती कारवाई करण्याची मागणी  आपण निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे मलिक यांनी या वेळी सांगितले.  

"सामना’वर बंदी ही लोकशाहीची हत्या : मलिक
भाजपकडून प्रसिद्धी माध्यमांचा  गळा दाबण्याचे काम सुरू  आहे. मध्यंतरी एनडीटीव्हीच्या  प्रसारणावर बंदी घालण्यात आली होती. आता दै. सामनावर तीन दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपने केली आहे. अशा पद्धतीने लोकशाहीची  हत्या करण्याचा प्रयत्न हाेत असल्याचे मलिक म्हणाले.

नीलेश राणेंची मुख्यमंत्र्यांविराेधात तक्रार
काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. चिपळूणच्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी २५ हजार काेटींचा अर्थसंकल्पा सादर करण्याची घाेषणा केली हाेती. असे करुन मुख्यमंत्र्यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असून यातून अाचारसंहितेचा भंग हाेताे, असे निवडणूक अायाेगाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले अाहे.

बातम्या आणखी आहेत...