आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचे मध्यावधीचे संकेत, प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या मते तशी शक्यता नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मध्यावधी निवडणुकीचा अंदाज घेत असताना आणि मुख्यमंत्र्यांनीही तसे संकेत दिले असताना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र मध्यावधी निवडणुका होणार नसल्याचे सांगत गुरुवारी वेगळा सूर लावला.
 
अमित शहा शुक्रवारपासून राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याची माहिती देण्यासाठी दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेनेकडून होत असलेल्या कोंडीमुळे भाजपला राज्यात एकहाती सत्ता हवी आहे. यासाठी मध्यावधीची तयारी सुरू आहे. मात्र, याबाबत दानवेंनी कानावर हात ठेवले. ते  म्हणाले. मध्यावधीचा विचार आम्ही करत नाही, पण जर निवडणुका झाल्याच तर पदाधिकाऱ्यांची नेहमीच तयारी असावी लागते.

उद्धव यांचा पलटवार
शेगावमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, कर्जमुक्तीला फाटा म्हणजे मध्यावधीचे वक्तव्य. मध्यावधीसाठी लागणारा सर्व पैसा शेतकऱ्यांना देऊन सातबारा कोरा करावा.
बातम्या आणखी आहेत...