आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP Support Independant Candidate Against Dhananjay Munde

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद पोटनिवणूक: धनंजय मुंडेंच्या विरोधात भाजपचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजपने अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच संसदेचे अधिवेशन सुरू असतानाही भाजप नेते गोपीनाथ मुंडे सोमवारी मुंबईत आले होते. 2 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होत आहे.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपतर्फे उमेदवारी भरलेल्या बसवराज मंगळुरे आणि र्शीप्रसाद शुक्ला यांनी अर्ज मागे घेतले. भाजप-शिवसेना-शेकाप यांनी काकडे यांना पाठिंबा दिला आहे. धनंजयच्या पाठी बहुमत असल्याने भाजपने निवडणूक फार प्रतिष्ठेची केली नसल्याचे समजते. संख्याबळावर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट असताना काकडे यांना पाठिंबा देण्याचे कारण काय, असे विचारले असता मुंडे म्हणाले की, राष्ट्रवादीने बीडचा उमेदवार दिला म्हणून आम्ही बारामतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहोत. काकडेंशी आपले जुने मैत्रीपूर्ण संबंध असून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माळेगाव येथील साखर कारखाना काकडेंच्या मदतीने आपण एकदा जिंकला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.

धनंजय मुंडे उभे राहणार असल्यामुळे आपण संसदेचे अधिवेशन सोडून मुंबईत आलात का, असेही या वेळी मुंडेंना विचारण्यात आले. पण ही निवडणूक मुंडे विरुद्ध मुंडे अशी नसल्याचे ते म्हणाले. तसेच सरकारच्या कारभाराला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही कंटाळले असून त्यांच्या सद्सदविवेकबुद्धीवर आपण ही निवडणूक सोडतो, असे वक्तव्य त्यांनी केले.


आघाडीचे संख्याबळ 169
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे सर्मथक अपक्ष यांचे बलाबल 169 होते तर भाजप, शिवसेना, शेकाप, अपक्ष बरोबर घेऊन त्यांची संख्या 97 पर्यंत जाते. या निवडणुकीबाबत मनसेने भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र त्यांचा पाठिंबा मिळाला तरी विरोधकांची संख्या 110 च्या पुढे जात नाही.