आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरीनंतर भाजप समर्थकांनी बोंबा पेरल्या, पाक नव्हे भारतच एकाकी पडलाय -शिवसेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उरीच्या लष्करी कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पटलावर पाकिस्तानला भारताने एकाकी पाडल्याचे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात उमटत आहे. या पार्श्वभूमिवर सामनाचा आजचा लेख महत्त्वपूर्ण आहे. पाकिस्तान नव्हे तर भारतच जणू एकाकी पडल्यासारखा दिसतोय. कुणीही आपल्या बाजूने येत नसून सर्व देश व्यवहारीक झाले आहेत. पाकिस्तानला घेरण्यात भारत सरकार अपयशी ठरले असल्याचा ठपका सामनाच्या अग्रलेखात ठेवण्यात आला आहे.
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जगात एकाकी पाडल्याचे आपण कितीही बोंबलून सांगत असलो तरी प्रत्यक्षात या सर्व पेरलेल्या बोंबा असून हिंदुस्थानच एकाकी पडला जात नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे. १८ जवानांच्या बलिदानाचा बदला घेऊन दिल्लीश्‍वर आपली खुमखुमी कधी सिद्ध करणार? पाकिस्तान दिल्लीश्‍वरांच्या ‘शब्दास्त्रा’ने हटणार्‍यांतला नाही. तिथे पाहिजे जातीचे असे आता दुर्दैवाने म्हणावे लागेल. देश संकटात आहे, तो अधिक गर्तेत जाऊ नये म्हणून आमचीही निर्वाणीची बोंबाबोंब आहे.
नक्की ‘एकटे’ कोण पडलेय?
निरर्थक दुनियादारी

हिंदुस्थानची गेली दोनेक वर्षे जी ‘दुनियादारी’ सुरू आहे ती निरर्थकच ठरली आहे. कारण ‘उरी’च्या भयंकर हल्ल्यानंतर एकही देश हिंदुस्थानच्या बाजूने ठामपणे उभा राहिला असेल तर शपथ! उरी हल्ल्यानंतर अनेक देशांनी दहशतवादाचा तोंडदेखला निषेध केला व त्या निषेधाचा वेगळाच अर्थ भाजपपुरस्कृत सोशल मीडियाने काढला आणि पाकिस्तानला एकटे पाडण्यात दिल्ली सरकार कसे यशस्वी झाले ते मांड्यांवर ‘थापा’ मारून सांगण्याचे कार्य जोमाने सुरू झाले. त्यातील पहिली थाप अशी की, रशियाने पाकिस्तानबरोबरचा युद्ध अभ्यास थांबवून पाकड्यांना चपराकच दिली. मात्र रशियाने असे काहीएक केले नसून रशियन फौजा युद्ध अभ्यासासाठी पाकिस्तानात दाखल झाल्या आहेत ही हिंदुस्थानच्या दुनियादारीला चपराक आहे. उरी हल्ल्यानंतर म्हणे ‘चीन’ पाकिस्तानवर भलताच संतापला आहे, पण हेसुद्धा झूठच निघाले. चीनने पाकिस्तानला असे वचन दिले आहे की, तुमच्यावर कोणतेही परदेशी आक्रमण झाल्यास आम्ही तुमच्यासोबत आहोत. ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहू. इंडोनेशियानेही उरी हल्ल्याचा निषेध केलाच होता. पण हिंदुस्थानशी ‘प्रेमा’चे वगैरे संबंध असलेल्या इंडोनेशियाने पाकिस्तानशी संरक्षणविषयक करार करण्याचे मान्य केले असून पाकिस्तानला संरक्षण सामग्री पुरवण्याचे ठरवले आहे. म्हणजे ‘नाती’ व दुनियादारीपेक्षा जो तो आपला स्वार्थ आणि धंदाच बघत आहे. जेद्दा येथून इस्लामी राष्ट्र संघटनांचे काम पाहणार्‍या संघटनेनेही (ओआयसी) कश्मीरप्रश्‍नी पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला आहे. मग मधल्या काळात आमच्या राज्यकर्त्यांनी अरब राष्ट्रांत जी दुनियादारी केली त्याचा काय उपयोग झाला? तुर्कस्तानने तर कमालच केली....
पुढील स्लाईडवर वाचा.... सामनाच्या अग्रलेखात काय सांगितले आहे. तुर्कस्थान, अमेरिका, रशिया आणि इतर देशांच्या भूमिकेविषयी....काय आहे सत्यपरिस्थिती....
बातम्या आणखी आहेत...