आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणाचा ठराव भाजप कार्यकारिणीत मंजूर, चंद्रकांत पाटलांनी मांडला ठराव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सध्याचा अत्यंत ज्वलंत विषय असलेल्या मराठा आरक्षणाबाबत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ठराव मांडण्याची एकीकडे गुरुवारी जोरदार तयारी झालेली असताना ती जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या पंकजा मुंडे आजारी पडल्याने अनुपस्थित राहिल्या. शेवटी चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला. एकमताने तो मंजूरही करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली.

पंंकजा मराठा आरक्षणाबाबतचा ठराव मांडणार या बातमीने राज्यात ओबीसी समाजाच्या भुवया उंचावल्या होत्या. छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ निघालेल्या ओबीसी मोर्चाची याला पार्श्वभूमी होती. मराठ्यांनंतर राज्यात ओबीसींची संख्या मोठी असून दिवंगत गोपीनाथ मंुडे यांना मानणारा हा वर्ग आहे. मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण दिले जाऊ नये, अशी ओबीसींची मागणी आहे.

या पार्श्वभूमीवर मराठ्यांना आरक्षण देण्याचा ठराव मांडणे भविष्यात अडचणीचे ठरू शकते म्हणून पंकजांनी बैठकीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे. ठराव मंजूर झाल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा नेत्यांवर कडाडून टीका केली. आजपपर्यंत मराठा समाजातील नेत्यांनी स्वतःचा फायदा पाहिला. यामुळे मराठा समाजाचे समाजिक आणि आर्थिक नुकसान झाले. आता सत्ता गेल्यानंतर त्यांना मराठा आरक्षण आठवले. आरक्षणाचा मुद्दा पुढे करून विराेधक राजकीय हेतूने माेर्चाला प्राेत्साहन देत असल्याची टीकाही पाटील यांनी केली.

काेंडी फाेडण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर
मराठा समाजाच्या मूक माेर्चाने राज्य ढवळून निघाले आहे. यातून ताेडगा काढण्यासाठी महत्वाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. १५ आॅक्टाेबरला काेल्हापूर येथे मराठा मूक माेचार्चे आयाेजन केले आहे. यावेळी पालकमंत्री या नात्याने पाटील माेर्चेकरांशी संवाद साधणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...