आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकेनंतर भाजपची \'मेड फॉर इच अदर’ जाहिरात मागे, मुख्यमंत्र्यांनी मीडिया सेलला खडसावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही तास उरले असताना भाजपने मुंबई महापालिकेसाठी तयार केलेली ‘मुंबई आणि भाजप मेड फॉर इच अदर’ ही जाहिरातच मागे घेतली आहे. यंदा इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपच्या प्रचाराच्या जाहिराती टीव्हीवर मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. 

मात्र, सर्व जाहिरांतीपैकी कॉलेज तरुणांना घेऊन तयार केलेली ‘भाजप आणि मुंबई मेड फॉर इच अदर’ या जाहिरातीची जास्त चर्चा आहे. सुमार दर्जामुळे या जाहिरातीवर सोशल मीडियामध्ये टीकेचा भडिमार सुरू झाला. नकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी ही जाहिरात मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या मीडिया सेललाही खडसावल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...