आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप ट्विटर हँडलवर मुख्यमंत्रीच झाले टार्गेट; ट्विटर हँडल हॅक झाल्याचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून रविवारी सकाळी चक्क मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणारे ट्विट प्रसारित झाल्याने राजकीय खळबळ उडाली. विरोधकांनीही संधी साधत ‘मनी वसे ते ट्विटरवर दिसे’अशी झोंबणारी टीका केली. तर आपले ट्विटर हँडल हॅक झाल्याचा दावा करत भाजपने बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. झाल्या प्रकाराने दिवसभर नेटिझन्सची मात्र चांगलीच करमणूक झाली.  


रविवारी सकाळी महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य करण्यात आले. ३० टक्के सरकारी नोकरकपात धोरणावरून फडणवीस सरकारला लक्ष्य करत हे ‘ मेक इन महाराष्ट्र’ आहे की ‘फुल इन महाराष्ट्र’ आहे, असा खडा सवाल भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसारित झालेल्या या ट्विटमध्ये करण्यात आला होता. विशेष म्हणजे हे ट्विट पंतप्रधान, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या काही नेत्यांना टॅग करण्यात आले होते.


मनी वसे ते ट्विटरवर दिसे काँग्रेस 

आम्ही अडीच वर्षांपासून हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ‘मनी वसे ते ट्विटरवर दिसे’ असा टोलाही ट्विट करून मारला.

बातम्या आणखी आहेत...