आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता हा वाघ भेट, अनोखे गिफ्ट होते चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी स्वत: एक वाघ भेट दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेना युतीतील मोठ्या भावाच्‍या रूपातील पक्ष होता. मात्र निकालानंतर शिवसेनेला छोट्या भावाच्या भूमिकेत जावे लागले शिवाय सत्‍तेतही मानाचे स्‍थान मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेने सत्तेत असूनही भाजपवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. ही धुसफूस कायम असताना मुनगंटीवारांनी उद्धव यांना वाघ दिला. हा वाघ युतीत संवादाचे नवे दालन उघडू शकते, असे यानिमित्ताने बोलले जात होते. आज मुनगंटीवार राज्‍याचा अर्थसंकल्‍प सादर करत आहेत. त्‍यानिमित्‍त जाणून घेऊया या अनोख्‍या भेटीविषयी..
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेली वाघ भेट विशेष चर्चेत राहिली होती.
- हा फायबरचा वाघ नाशिकमध्ये तयार करण्‍यात आला होता.
- ही वाघाची प्रतिकृती 7 फूट लांब, 3.5 फूट रुंद आणि जवळपास 55 किलो वजनाची आहे.
- या अनोख्या गिफ्टमुळे भाजप आणि शिवसेनेतील ताणले गेलेले संबंध सुधारण्यासाठी मदत होईल अशी होती.
- हा वाघ आमच्या मैत्रीचे प्रतिक आहे आणि यातून आम्ही 'सेव्ह द टायगर्स' या मोहिमेचाही प्रसार करणार आहोत, असे मुनगंटीवार म्‍हणाले होते.
- विधानसभा निवडणुकांनंतर भाजपने शिवसेनेला डावलले, त्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये चांगलेच युद्ध रंगले होते.
- याआधी व्याघ्र मोहीमेचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर अमिताभ बच्चन यांनाही असाच वाघाचा पुतळा दिला होता.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, मुनगंटीवार म्‍हणाले सर्वात जास्‍त वाघ चंद्रपूरात.. त्‍यावर उद्धव म्‍हणाले..
बातम्या आणखी आहेत...