आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपकडून काळ्या पैशांचा वापर; प्रत्येक उमेदवाराला दिले १५ लाख, नवाब मलिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील भाजपचे यश हे काळ्या पैशाच्या जोरावर मिळवलेले अाहे. या पक्षाने अापल्या प्रत्येक उमेदवाराला १५ लाख रुपये वाटले आणि हे उमेदवार प्रत्येक मतासाठी १० ते १५ हजार रुपयांचे वाटप करत होते. प्रदेशाध्यक्ष प्रचाराला जाताना हेलिकाॅप्टरमधून हे पैसे नेत हाेते’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

नगरपालिका निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अाता सत्ताधारी भाजपवर अाराेपांची राळ उठवली अाहे. मलिक म्हणाले, ‘बंद नोटांचा इफेक्ट म्हणूनच भाजपच्या यशाकडे पाहावे लागेल. अनेक ठिकाणी एमआयएमबरोबर भाजपने छुपी युती केली होती. त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून निवडणूक लढवली. मात्र, लाेकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मतांत अाता पन्नास टक्के घट झाली,’असा दावाही त्यांनी केला.

पुढे वाचा... राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
बातम्या आणखी आहेत...