आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Wants Government To Buy London House Where Dr Babasaheb Ambedkar Once Lived

बाबासाहेबांनी वास्तव्य केलेले लंडनमधील घर राज्य सरकार विकत घेणार- विनोद तावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधील ज्या घरात वास्तव्य केले होते ते घर राज्य सरकार विकत घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. तसेच या बंगल्यात 14 एप्रिलपूर्वी भव्य स्मारक उभारू अशी घोषणाही तावडे यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये 1921-1922 या काळात याच घरात राहत होते. हे घर तीनमजली आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला ही मालमत्ता खरेदी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, पण आता भारतीय प्रशासनाचा त्यातील रस संपल्याचे दिसते असे गोल्डश्मिट अँड हॉलंड या कंपनीच्या एजंटने म्हटले होते. त्यानंतर राज्य सरकारने हालचाली पुन्हा सुरु केल्या आहेत.
तावडे हे लंडनला एका शिक्षण परिषदेसाठी गेले आहेत. त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांचे वास्तव्य असलेल्या बंगल्याची पाहणी केली. त्यानंतर तावडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हे घर घेण्याबाबत बातचित केली. सहा महिन्यापूर्वीच हे घर संबंधित मालकाने विकायला काढले होते. आघाडी सरकारनेही हे घर विकत घेण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले आहे. दरम्यान, आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी भाजप सरकार व विनोद तावडेंचे अभिनंदन केले आहे.

हे घर विकत घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लिहिले होते. हा बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी तसेच महाराष्ट्रातील जनतेसाठी भावनेचा प्रश्न आहे, असे शेलारांनी पत्रात म्हटले होते.
पुढे आणखी वाचा, किती किंमत आहे या घराची व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते याबाबत...