आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CM नी फुंकली स्वबळाची तुतारी, शिवसेनेवर शेलार म्हणाले- राक्षसाला बाटलीबंद करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्याबाबतचा निर्णय स्थानिक नेतेच घेतील, असे कालपर्यंत बाेलणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अापला सूर बदलत मुंबई महापालिकेसाठी स्वबळाची तुतारी फुंकली. ‘आपल्यासमोर ११४ हून अधिक जागा मिळवण्याचे लक्ष्य असून ते पूर्ण करण्यासाठी आतापासून कामाला लागा,’ असे अावाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना चक्क राक्षसाशी केली.
‘पायाभूत सुविधांअभावी गेली अनेक वर्षे मुंबईचा चेहरा बदललेला नाही. तो बदलण्यासाठी भाजपकडे एकहाती सत्ता हवीच,’ असा अप्रत्यक्ष हल्लाबाेलही त्यांनी शिवसेनेवर केला.
भाजपच्या मेळाव्यात ते बाेलत हाेते.
‘विकास हा फक्त बोलून दाखवायचा नसतो, तो प्रत्यक्षात करून दाखवायचा असतो. तो भाजपने राज्याची सत्ता आल्यानंतर दाखवून दिला आहे. गेल्या दीड वर्षात मुंबईसाठी सरकारने खूप प्रभावी असे निर्णय घेतले असून हे निर्णय लोकांपर्यंत घेऊन जा अाणि आपल्या वाॅर्डवर लक्ष ठेवून कामाला लागा,’ असे अावाहनही फडणवीस यांनी केले. भाजप हा कुण्या एकाच्या मालकीचा पक्ष नसून तो लोकांचा पक्ष असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टाेले लगावले. लोकांना फार काळ अाश्वासन देऊन भुलवता येणार नाही. त्यांना आता विकास हवा आहे. आधीच्या काँग्रेस आघाडीने फक्त भूलथापा दिल्या होत्या. भाजपचे सरकार केंद्र व राज्यपातळीवर विकासाचे वेगाने निर्णय घेत आहे. यामुळेच िवजयापासून भाजपला कोणी रोखू शकणार नाही, असा िवश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
पुढे वाचा, पुन्हा शेलारच... वाचा शेलार यांनी भाषणात काय म्हटले... शिवसेनेची आणि उद्धव यांची तुलना केली राक्षसाशी.... शिवसैनिकांनी पुन्हा जाळला शेलार यांचा पुतळा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा.धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...