आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावेद हबीब यांच्या सलूनवर भाजप कार्यकर्त्यांनी शाई फेकली; ट्विटरवरून हबीब यांची माफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादमध्ये कॅनॉट परिसरातील सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या सलूनवर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यात आली. - Divya Marathi
औरंगाबादमध्ये कॅनॉट परिसरातील सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या सलूनवर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यात आली.
औरंगाबाद​/मुंबई- औरंगाबादमध्ये कॅनॉट परिसरातील सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या सलूनवर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यात आली. हबीब यांनी ट्विटरवरून याबाबत माफी मागितली आहे. 
 
हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काही वर्तमानपत्रांमध्ये आक्षेपार्ह जाहिरात दिल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. जाहिरातीमध्ये हिंदू देवी-देवता हबीब यांच्या सलूनमध्ये आल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचे या भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच औरंगाबाद शहरातील कॅनॉट परिसरातील जावेद हबीब सलून समोर निदर्शने करत शाईफेक करण्यात आली. जावेद हबीब यांच्या ट्विटर हँडलवरूनही जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्विटरवरील या पोस्टनंतर अनेकांनी हबीब यांना याचा जाब विचारला. त्यानंतर या प्रकरणी हबीब यांनी ट्विटरवरून माफी देखील मागितली.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...