आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp's Assembly Member Give Their One Month Salary To Drought Helps Fund

भाजप आमदारांकडूनही दुष्काळी निधीसाठी एक महिन्याचे वेतन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘राज्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदारांनी दुष्काळी निधीत मदत द्यावी’, या गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील कॉँग्रेसच्या आमदारांनी सोमवारी आपले एक महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ मंगळवारी भाजपच्या 47 आमदारांनीही एक महिन्याचा पगार दुष्काळग्रस्त निधीसाठी देण्याचे जाहीर केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनही दुष्काळी निधीसाठी 10 लाख रुपये देणार आहे. यात कर्मचा-याच्या एक दिवसाच्या वेतनाचा समावेश असल्याचे अध्यक्ष दिलीप सोपल यांनी जाहीर केले.
‘सवंग लोकप्रियतेसाठी दुष्काळाचा वापर करू नका’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. यावर काँग्रेसच्या वरिष्ठ आमदाराने सांगितले की, सध्या दुष्काळाची तीव्रता वाढलेली आहे. अशा स्थितीत मदत करणे आमचे कर्तव्य आहे. आम्ही लोकप्रियतेसाठी अशा घोषणा करीत नाही. आमच्या शक्तीनुसार आम्ही मदत करीत आहोत.

मुख्यमंत्र्यांना दुष्काळ दौरा आवडत नाही
दुष्काळग्रस्तांच्या मदतीबाबत सुरू असलेल्या योजनांच्या माहितीबाबत मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असता सांगण्यात आले की, मुख्यमंत्र्यांना दुष्काळग्रस्त विभागांचा दौरा करणे आवडत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, दौरा करून काहीही साध्य होत नाही. मी रोजच्या रोज माहिती घेत आहे. राज्यातर्फे जी मदत दिली जात आहे ती योग्यरीत्या पोहोचते की नाही याकडे त्यांचे लक्ष असून सगळ्यांना त्यांनी मदत व्यवस्थित पोहोचवावी यासाठी कडक निर्देश दिले असल्याची माहितीही मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.