आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP's New Team For Stopping Allegation On Ministers

मंत्र्यांवरील आरोप रोखण्यासाठी भाजपची नवी टीम, अमित शहा यांचा पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मध्य प्रदेशमधील व्यापमं घोटाळा तसेच महाराष्ट्रातील मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपांमुळे देशभरात भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांवरील आरोप रोखण्यासाठी पक्षाने नवी टीम तयार केली अाहे. ही टीम फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल मीडियावरील मंत्र्यांविरुद्ध होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना चाेख प्रत्युत्तर देण्याचे काम करणार अाहे. यासाठी स्वत: पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे.
माजी पत्रकार आणि भाजपचे खासदार एम.जे. अकबर आणि पक्षाचे सचिव श्रीकांत शर्मा यांच्यावर टीमची जबाबदारी सोपवण्यात आली असून सिद्धार्थ नाथ सिंह, अनिल बालुनी आणि सुदेश वर्मा यांचाही या टीममध्ये समावेश करण्यात अाला अाहे.

दरम्यान, अमित शहा बुधवारी रात्री मुंबईत दाखल झाले अाहेत. भाजपच्या महासंपर्क अभियानानिमित्त अालेले शहा वादात अडकलेल्या फडणवीस सरकारसाठी ‘संकटमाेचक’ ठरू शकतात. गुरुवारी दिवसभर पक्षातर्फे अायाेजित कार्यक्रमासाठी शहा मुंबईत अाहेत. या वेळी ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून राज्यात पक्षासमाेर उद‌्भवलेल्या अडचणीतून मार्ग काढण्याची अाशा व्यक्त केली जात अाहे.