आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Black Money Account Holders Name Reveled, Narayan Rane Dissmissed Allegation

काळ्या पैशाच्या ‘बॉम्ब’ने राजकीय नेत्यांना फुटला घाम; नारायण राणेंकडून खंडन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशासह जगभरातील आघाडीच्या वर्तमानपत्रांनी एचएसबीसी या विदेशी बँकेत खाते असणा-या राज्यातील राजकीय नेते वा त्यांच्या कुटुंबीयांची नावे उघड केल्याने राज्याचा राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे नाव उघड झालेले राजकारणी आपली खातीच नसल्याचे खुलासे करून बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे अनेक नेते आपले नाव तर उघड होणार नाही ना, या भीतीने धास्तावले आहेत.

ला मोंडे, इंडियन एक्स्प्रेस, गार्डियन अशा वर्तमानपत्रांनी संयुक्तरीत्या राबवलेल्या एका शोधमोहिमेत भारतातील हजारांवर लोकांची खाती एचएसबीसीच्या स्वित्झर्लंडस्थित बँकेत असल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. त्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि पुत्र नीलेश राणे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सून स्मिता जयदेव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांचे पुत्र सुभाष व सून इंद्राणी यांच्या नावानेही या बँकेत खाते असल्याचे वृत्त या दैनिकांनी प्रसिद्ध केले आहे. हे वृत्त प्रसिद्ध होताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

राणे हे आता काँग्रेसमध्ये असले तरी पूर्वी ते शिवसेनेत होते आणि याच पक्षाचे नेते म्हणून त्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. तसेच शिवसेनाप्रमुखाच्या कुटुंबातील सदस्याचेही खाते असल्याने सत्ताधारी असोत की विरोधक, दोघांनीही या विषयावर अळीमिळी गुपचिळी राखणेच पसंत केले. नारायण राणे यांनी स्पष्ट शब्दांत असे कोणतेही खाते आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नसल्याचे सांगितले. स्मिता ठाकरे यांच्या मुलाचा सोमवारी विवाह समारंभ असल्याने त्या प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

पुढे वाचा... उद्योजकांशी जवळीक असणा-यांची पंचाईत