आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसईत स्फोट; तीन महिलासह एक जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसई: वसईतील दाभोळी परिसर मंगळवारी सकाळी रासायनिक पदार्थाच्या स्फोटाने हादरला. रस्त्यावर पडलेल्या एका प्लास्टिकच्या पिशवीत ज्वलनशील पदार्थाचा स्फोट झाल्याचे पोलिसांनी स्पष्‍ट केले. या स्फोटात तीन महिला आणि एक पुरुष असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
दाभोळी परिसरात एका जाहिरातीच्या बोर्डाजवळ तीन महिलांना एक प्लॅस्टिकची पिशवी पडलेली दिसली. पिशवीत काय आहे, हे पाहण्यासाठी एक महिलेने पिशवी उचलली. तितक्यात स्फोट झाला. या स्फोटात तिन्ही महिला जखमी झाल्या. तसेच रस्त्यावरून जाणारा एक पुरुषही जखमी झाला. स्फोट हा घातपात नसून अपघात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पिशवीतील रासायनिक पदार्थाचे नमुने प्रयोग शाळेत पाठवण्यात आल्याचे ही पोलिसांनी सांगितले.
दबंग 2 चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी स्फोट, तीन जण जखमी
गॅस सिलिंडरचा स्फोट; एक गंभीर