आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साकीनाका स्‍फोटः 5 जण ठार, कारखान्‍यात होता स्‍फोटकांचा अवैध साठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - साकीनाका परिसरातील एका कारखान्यात स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. साकीनाका भागातील खैराणी रोडवर असलेल्या एका कारखान्यात स्फोट झाला, त्याला लागून असेलेल्या बैठ्या चाळीवर कारखान्याची भिंत कोसळली आणि त्यात पाच जण दगावले तर, सात जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

प्रत्‍यक्षदर्शींनी दिलेल्‍या माहितीनुसा, भिंतीखालून 3 महिला आणि 2 लहान मुलांना वाचविण्‍यात आले. हा कारखाना ऍल्‍युमिनियमचा आहे. कारखान्‍यात अवैधरित्‍या काही स्‍फोटके साठविण्‍यात आली होती. या स्‍फोटकांचा कशासाठी साठा करण्‍यात आला होता तसेच त्‍यांचा स्‍फोट कसा झाला, याचा तपास एटीएसने सुरु केला आहे.

स्फोट कशामुळे झाला याची माहिती मिळाली नसून, घटनास्थळी एटीएस आणि बॉम्ब नाशक पथकही दाखल झाले आहे.