मुंबई/जयपूर- देशात निर्बंध घालण्यात आलेला मोबाइल गेल 'ब्लू व्हेल' खेळणार्या जयपूरच्या एका विद्यार्थ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या त्याचे आई-वडील आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे या विद्यार्थ्याचे प्राण वाचले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुलगा हा रसूखदार कुटुंबातील आहे. त्याला एक टास्क मिळाला होता. ते पूर्ण करण्यासाठी तो मुंबईत आला होता.
पोलिस उपायुक्त (वेस्ट) अशोक कुमार गुप्ता यांनी सांगितले की 21 ऑगस्टला कनकपुरा सिरसी रोड येथील मीणावाला येथे राहाणारा राहुल बागला बेपत्ता झाला होता.
- या प्रकरणी विहार जयपुरमध्ये तक्रार दाखल केली होती.
- चौकशी केली असता विद्यार्थी मोबाइलवर 'ब्लू व्हेल' गेम खेळत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली होती.
- राहुल मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लोकेशनच्या आधारावर मुलगा मुंबईतील चर्चगेटमध्ये दाखवत होते.
- 'ब्लू व्हेल' गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी राहुलने मुंबईत एक चाकू खरेदी केला होता.
- चाकूने तो स्वत:ची हत्या करणार होता.
पुढील स्लाइडवर वाचा... 'ब्लू व्हेल' इज सुसाइड गेम... ब्लेडने हात कापण्यापासून दिले जातात 50 चॅलेंज!