आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नालेसफाई घोटाळा: BMCच्या मुख्य अभियंत्यासह 4 उपअभियंते निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई महानगर पालिकेतील नालेसफाई घोटाळ्यात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पालिका आयुक्तांनी शनिवारी मुख्य अभियंत्यासह 6 उपअभियंते आणि 4 सहाय्यक अभियंत्यांना निलंबित केले आहे. त्यासोबतच 4 मुकादमांनाही निलंबित करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रांताध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत नालेसफाईत 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, हे विशेष.


मुंबई महानगर पालिकेने अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्याबरोबरच ठेकेदारांवर आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.