आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bmc Byelection, Shivsena Win Ghatala Village Seat

मुंबई महापालिका: चेंबूर पोटनिवडणुकीत शिवसेनेचा मोठा विजय, काँग्रेस आपटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील चेंबूरमधील घाटला व्हिलेज वॉर्डातील महापालिका पोटनिवडणूकीत शिवसेनेने मोठा विजय खेचून आणला आहे. शिवसेनेने उमेदवार अनिल पाटणार यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र नगराळे यांचा 6627 मतांनी दारूण पराभव केला.
काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या अनिल पाटणकर व नारायण राणेंचे पुत्र आमदार नीतेश राणे यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने पाटणकरांनी राजीनामा दिला होता. पाटणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. या वॉर्डातील पोटनिवडणूक जाहीर होताच सेनेने पाटणकरांना उमेदवारी दिली. मात्र, तेथील स्थानिक शिवसैनिक मंगेश तावटे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. तर, काँग्रेसने राजेंद्र नगराळे यांना तिकीट दिले. नगराळे हे मनसेत होते. मात्र, राणेंनी त्यांना काँग्रेसमधून तिकीट दिले. चेंबूर परिसर राणेंचा बालेकिल्ला मानलो जातो. त्यातच मागील जागा काँग्रेसने जिंकली होती. आता विजयी उमेदवार शिवसेनेत आला असला तरी तवटेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली होती. यातच राणेंनी ताकद लावली. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे लक्ष होते. भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. मनसे तटस्थ होती.
रविवारी झालेल्या या पोटनिवडणुकीत अखेर शिवसेनेच्या पाटणकर यांनी मोठा विजय खेचला. पाटणकर यांना 11 हजार 517 मते मिळाली तर काँग्रेसच्या नगराळेंना 4,890 मते पडली तर शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार तवटेंना 4,317 मते मिळाली. पाटणकर यांनी नगराळेंचा 6,627 मतांनी दारूण पराभव करीत मोठा विजय संपादन केला.
नवी मुंबईत राष्ट्रवादीची बाजी-
नवी मुंबई पालिकेच्या नेरुळमधील प्रभाग 88 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिल्पा कांबळी यांचा निसटता विजय झाला. कांबळी यांनी काँग्रेसच्या नूतन राऊत यांचा केवळ 76 मतांनी पराभव केला. या विजयानंतर गणेश नाईक यांनी आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिल्पा कांबळे यांना 1818 मते तर राऊत यांना 1742 मते मिळाली तर भाजपच्या सरस्वती पाटील यांना 1023 मते मिळाली. भाजपच्या सरस्वती पाटील या तिस-या क्रमांकावर फेकल्या गेल्या. पालकमंत्री एकनाथ शिंदे व आमदार मंदा म्हात्रे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, गणेश नाईक यांनी आपणच येथील सम्राट असल्याचे दाखवून दिले आहे.