आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई महापालिकेची तिजोरी ओव्हरफ्लो, कर व देयकांची ५५० कोटी कराची रक्कम झाली जमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मालमत्ता व पाणी कराची देयके मिळवताना मुंबई महापालिकेच्या नाकी नऊ येत असतात. मात्र, नोटंबदीच्या निर्णयाने मुंबई महापालिकेच्या तिजोरीत मुंबईकरांनी तब्बल साडेपाचशे कोटी रुपये जमा केले असून नोटबंदीमुळे अनेकांचे हाल झाले. मात्र, मुंबई पालिका मात्र या निर्णयाने खरोखरच मालामाल झाली आहे.

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला. मात्र, सरकारी कर व इतर देयके भरण्यासाठीही पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात ११ नोव्हेंबरपासून सरकारी देयके जुन्या नोटांच्या स्वरूपात घेण्यास स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुरुवात केली. त्यानंतर मुंबईकरांनी मालमत्ता कर, पाणी व बेस्टची वीज देयके भरण्यासाठी रांगा लावल्या. ११ ते १४ तारखेपर्यंत महापालिकेच्या कर विभागाकडे सव्वाशे कोटी रुपये जमा झाले होते. या काळात जुन्या नोटा खपवण्यासाठी थकीत देयके मुंबईकरांनी भरून टाकली.

कर देयके भरण्यास प्रथम १४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती. नागरिकांचा प्रतिसाद पाहून ती मुदत २४ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांनी या सवलतीचा चांगलाच लाभ घेतला. २४ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत महापालिकेच्या करसंकलन विभागात साडेपाचशे कोटी रुपये जमा झाल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली .दरम्यान, असेच काहीसे चित्र राज्यभरातील पालिकांत पहायला मिळाले. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड जमा झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...