आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BMC Commissioner Sitaram Kunte Presentied BMC Budget For 2015 16 Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बजेट: मुंबई पालिकेचा यंदाचा 33 हजार 514 कोटींचा अर्थसंकल्प सादर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महापालिकेचे सन 2015-2016 या आर्थिक वर्षासाठी बिग बजेट सादर करण्यात आले. मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. सिताराम कुंटे यांनी हे बजेट स्थायी समितीच्या अध्यक्षांसमोर सादर केले. मुंबई पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात मागील वर्षीपेक्षा 27 टक्क्यांनी घसघशीत वाढ झाली आहे. 31 हजार कोटींवरून मुंबई महापालिकेचे बजेट यंदा 33 हजार 514 कोटींपर्यंत गेले आहे. यात पालिकेला निव्वळ महसूली उत्पन्न 23 हजार 509 कोटी रूपये अपेक्षित आहे.
बजेटमधील एकून रक्कमेच्या सुमारे दहा टक्के रक्कम ही मुंबईतील रस्ते विकासासाठी वापरण्यात येणार आहे. मुंबईतील रस्ते डांबरी व सिमेंट काँक्रीटने बांधण्यासाठी सुमारे 3 हजार 209 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर सागरी (कोस्टल) महामार्गासाठी सुमारे 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
यंदा 1 एप्रिलपासून जकात रद्द करून त्याऐवजी पर्यायी करव्यवस्था येण्याची शक्यता आहे. तसेच आगामी काळात जीएसटी करप्रणाली येणार असल्याने मुंबई महापालिकेचे उत्पन्न घटण्याचा अंदाज बांधण्यात आला असून त्यासाठी उत्पन्नाचे विविध स्त्रोतांचा विचार केला जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून स्लम भागातील झोपड्यांना टॅक्स लावण्याचा विचार पालिका करीत आहे.
खाली पाहा, मुंबई महापालिकेने आगामी वर्षासाठी केलेली तरतूद
- 33 हजार 514 कोटींचा रूपयांचे मुंबई पालिकेचे बजेट
- मागील वर्षीपेक्षा बजेटमध्ये यंदा 27 टक्क्यांनी वाढ
- मुंबई पालिकेला यंदा महसूली उत्पन्न 23 हजार 509 कोटी रूपये अपेक्षित
- डांबरी, सिमेंट क्राँक्रीट 3 हजार 209 कोटी रस्ते विकास
- सागरी (कोस्टल) रोडसाठी 200 कोटींची तरतूद
- मुंबईला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी विशेष तरतूद
- मुंबईतील सर्व रस्त्यांवर सप्टेंबरपर्यंत एलईडी दिवे बसवणार
- मुंबई महापालिका कर्मचा-यांच्या आरोग्य विमा योजनेसाठी 75 कोटींची तरतूद
- शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अखंड ज्योतीसाठी 50 लाखांची विशेष तरतूद
- कचरा गोळा करण्यासाठी 1148 स्वयंसेवकांची नियुक्ती
- 1 एप्रिलपासून जकात रद्द होण्याची शक्यता
- जीएसटीमुळे पालिकेचे उत्पन्न घटण्याची शक्यता, इतर कर वाढविण्याबाबत विचार होणार
- घनकच-यासाठी मुंबईबाहेर तळोज्याजवळ 126 एकर जमिन संपादित
- आयटीसाठी 75 कोटींची तरतूद
- महिला स्वच्छतागृहांसाठी 5. 25 कोटींची तरतूद
- 560 कोटी रूपये, पालिका इमारत दुरुस्ती व पुर्नबांधणी
- स्मशानभूमी सीएनजी कनेक्शनसाठी 4 हजार कोटींची तरतूद
शिक्षण

- 200 शाळांमध्ये संगणकीय लॅब
- सर्व मुलांना बॅंन्चेच उपलब्ध करून देणार
- 29 कोटी रूपये प्राथमिक शिक्षण सुधार कार्यक्रमांतर्गत
- व्हच्यूअल क्लासरूम उपलब्ध करून देणार.