आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BMC Officials Reach Campa Cola Compound, FIR Againest Resident

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅम्पाकोलावासियांच्या विरोधात FIR दाखल, पाडापाडीची कारवाई आजही नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महापालिकेचे अधिकारी वरळीतील कॅम्पाकोला सोसायटीतील वीज, गॅस, पाणी आदी कनेक्शन तोडण्यासाठी व नागरिकांची समजूत काढण्यासाठी गेले असता त्यांना गेटवरच अडविण्यात आले. गेट बंद केल्याने व रहिवाशांनी गेटला घेराव घातल्याने अधिका-यांना बळजबरी करता येत नव्हती. अखेर पालिका अधिका-यांनी शासकीय कामात अडथळा आणणे, गैरवर्तन करणे आणि सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी सोसायटीतील रहिवाशांविरू्दध वरळी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
कॅम्पाकोलामधील रहिवाशांनी कालच्या प्रमाणेच आज अधिका-यांना सोसायटीत प्रवेश करण्यापासून रोखले. तसेच ते सर्व हात जोडून विनंती करीत होते. मात्र, ते सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघनही करीत होते. अधिका-यांनी या रहिवाशांनी बंद केलेले गेट व उभी केलेली मानवी भिंत यांचे फोटो काढून घेतले आहेत. हे फोटो पुरावे म्हणून आरोपपत्रात जोडले जाणार आहेत. अधिका-यांनी रहिवाशांना आवाहन केले होते की, आम्ही आज कोणतेही कारवाई करणार नाही. त्याचबरोबर पोलिस बंदोबस्तही हटविण्यात आला होता. तरीही रहिवाशी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.