आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जप्त केलेल्या वस्तूंची अशी होते लूट, पाहा कसा होतो भ्रष्टाचार, प्रसंग कॅमे-यात कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा व्हिडिओ एका तरूणीने बनवला आहे. ज्यात बीएमसी कर्मचारी भाजी चोरताना दिसत आहे. - Divya Marathi
हा व्हिडिओ एका तरूणीने बनवला आहे. ज्यात बीएमसी कर्मचारी भाजी चोरताना दिसत आहे.

मुंबई- मुंबईत अनेक ठिकाणी मुंबई महानगरपालिका (बीएमसी) कडून अतिक्रमण विरोधी अभियान चालवले जात आहे. या अभियानातंर्गत अवैध फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात आहे. याचाच भाग म्हणून मंगळवारी बीएमसी कर्मचा-यांनी अवैध फेरीवाल्यांचे सामान जप्त केले. हे सामान घेऊन जाताना कर्मचा-यांचे खूपच हैराण करणारे व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओत जप्त केलेल्या भाज्या चोरताना हे कर्मचारी दिसत आहेत. व्हिडिओ समोर येताच आता त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. काय आहे व्हिडिओत....

 

- मुंबईत राहणा-या सोनीजी भूमिका नावाच्या एका तरूणीने आपल्या फेसबुक पेजवर बीएमसी कर्मचा-यांचा हा उद्योग व्हिडिओत कैद केला आहे. 
- यात जप्त केलेले सामान कर्मचारी एका ट्रकमध्ये भरून नेताना दिसत आहेत. रस्त्यात ट्रक थांबताच बीएमसी कर्मचारी प्लॅस्टिकच्या थैलीत भाज्या भरताना दिसत आहेत.  
- काही वेळात ट्रकचा ड्रायव्हर आणि काही अन्य कर्मचारी ट्रकमध्ये जातात आणि त्यातील काही सामान उचलून ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घेऊन जाताना दिसतात.
- केबिनमध्ये आधीच वडापाव ठेवलेले दिसत आहेत. व्हिडियोसोबत भूमिकाने लिहले की, "बीएमसी कर्मचा-यांनी हे सामान बीएमसी ऑफिसमध्ये घेऊन जाणे अपेक्षित आहे. मात्र, पाहा हे कसे मजेने वडापाव खाताना दिसत आहेत.

- दीड मिनिटांचा हा व्हिडिओ भ्रष्टाचाराचे एक छोटे चित्र दाखवतात. जर हे पब्लिक प्लेसवर अशा पद्धतीने लूट माजवच आहेत तर जरा विचार करा जनतेचे काय हाल होत असतील."

 

व्हायरल झाला व्हिडिओ-

 

- भूमिकाचा हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करताच व्हायरल झाला आहे. याला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. आणि कमेंट करत लाईक करत आहेत. 
-व्हिडिओत दिसणारे आरोपी कर्मचा-यांविरोधात केस दाखल करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत. मात्र, व्हिडिओ आल्यानंतर बीएमसीकडून अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही.  
- व्हिडियो पोस्ट करणारी भूमिकाच्या या प्रयत्नाचे जोरदार कौतूक होत आहे. लोक म्हणताहेत की, भूमिकाचा हा प्रयत्न सांगून जातो की सरकारी कार्यालयात भ्रष्टाचाराची कशी कीड लागलेली आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बीएमसी कर्मचा-यांची कशी पकडली चोरी....

बातम्या आणखी आहेत...