आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकून व्हायरल झाला या अॅक्ट्रेसचा मोबाइल नंबर; लोकांनी पाठवले मेसेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात मंगळवारी मुंबईसह 10 महापालिकांसाठी मतदान होत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी बीएमसीच्या अधिकार्‍यांकडून एक चूक झाली होती. या चुकीचा खामियाजा सिनेमाची अभिनेत्री अवनी मोदी हिला चांगलाच मनस्ताप झाला होता. दरम्यान, बीएमसीने चुकून अवनीचा मोबाइल नंबर एका जाहिरातीत प्रसिद्ध केला होता. यानंतर व्होटर कार्डमध्ये सुधारणा करण्‍यासाठी अनेक कॉल्स आणि मेसेज येत होते.

- मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएमसीतर्फे स्थानिक वृत्तपत्रांना एक जाहिरात दिली होती. 
- कार्डमधील चुका दुरुस्त करण्याचे आवाहत या जाहिरातीतून करण्‍यात आले होते.
- जा‍हिरातीमध्ये एक मोबाइल नंबर देण्यात आला होता. त्यावर व्होटर कार्ड संदर्भात तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

अवनीला आले हजारो कॉल... 
- दरम्यान, बीएमसीने या जाहिरातीत चुकून अवनी मोदी हिचा मोबाईक नंबर प्रसिद्ध केला होता. - एका दिवसांत तिच्या मोबाइलवर हजारो कॉल्स आणि मेसेज आले होते. 
- अवनीने सांगितले की, तिच्या मोबाइलवर एकापाठोपाठ कॉल येत असल्याने फार वैतागले होते. पण फोन स्विच ऑफ देखील करू शकत नव्हते. कारण अनेक प्रोफेशनल्स आणि  नातेवाईकांचे कॉल त्यावर येत होते.

चूक सुधारण्यासाठी बीएमसीने दिली दुसरी जाहिरात... 
- जबाबदार अधिकार्‍याने आपली माफी मागावी, अशी अवनी हिने म्हटले होते. अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी याबाबत दिलगिरी देखील व्यक्त केली होती. 
- याशिवाय बीएमसीने नवा नंबर 9029901901 दिला होता.

कोण आहे अवनी मोदी... 
- मधुर भंडारकरयांचा सिनेमा 'कॅलेंडर गर्ल'मधून अवनीने आपल्या करियरला सुरुवात केली होती. याशिवाय तिने अनेक गुजराती, मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अॅक्ट्रेस अवनी मोदीचे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...