आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bmc To Demolish Illegal Construction In Worli\'s High Profile Sukhada Shubhada On 10th Feb.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'सुखदा-शुभदा\'तील नेत्यांची अनधिकृत बांधकामं पालिका 10 फेब्रुवारीला पाडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील वरळी येथील सुखदा आणि शुभदा या उच्चाभ्रू सोसायटीतील अनधिकृत बांधकाम येत्या 10 फेब्रुवारीला मुंबई महापालिका पाडणार आहे. या सोसायटीत अनेक राजकीय नेत्यांनी अनधिकृतरीत्या ऑफिसे थाटली आहेत. गाळ्यांमध्येही वाढीव बांधकाम करून आपली दुकानेही थाटली आहेत. फ्लॅटमध्ये अनेक बदल केले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजप-सेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी या सोसायटीत घरे घेतली आहेत.
राजकीय नेत्यांनी वाढवलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी मुंबई महापालिकेने त्यांना मागील एक-दीड वर्षापासून सतत नोटिसा दिल्या आहेत. नोटिसा बजावल्या तरीदेखील त्यांनी पालिकेने सांगितल्याप्रमाणे बदल केले नाहीत किंवा बांधकाम हटविले नाही. त्यामुळे शेवटी त्यांच्या घरांवर आणि गाळ्यांवर हातोडा पडणारच होता. आता त्यामुळेच, मुंबई महापालिकेने स्व:तच ही बांधकामे पाडण्याचा निर्णय घेतला आहे. रणजीत देशमुख, अनिल देशमुख, पतंगराव कदम, अजित पवार, माणिकराव ठाकरे, अण्णा डांगे, प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी अनधिकृतरीत्या वाढीव बांधकाम केल्याचे पालिकेला आढळून आले आहे.
पतंगराव कदमांची भली मोठी जीमच अनधिकृत-
माजी मंत्री पतंगराव कदम यांची तर संपूर्ण व्यायामशाळाच अनधिकृत आहे. पतंगराव कदम यांनी 'शुभदा' सोसायटीत तीन गाळे घेतले आहेत परंतु ते एकत्र करून या ठिकाणी इसलॅण्ड नावाने जिम्नॅशियमच थाटले आहे. या इमारतीत जिम्नॅशियम उभारले तेदेखील तीन गाळे एकत्र करून. हे अनधिकृत असून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेने कदम यांना नोटीस बजावली आहे. तरीदेखील कदम यांनी जिम्नॅशियम सुरूच ठेवले आहे. विशेष म्हणजे कदम हे या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत. जेव्हा हातोडा पडेल तेव्हा पाहू, असे बेजबाबदार वक्तव्य कदम यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते.
पुढे वाचा, राजकीय नेत्यांच्या बांधकाम पाडण्याला सोसायटीतील रहिवाशांनी दिला पाठिंबा...