आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BMC To Take Measures For Controlling Illegal Constructions

अनधिकृत बांधकामांना चाप बसणार, मुंबई पालिकेने उचलली पावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाणे येथे इमारत कोसळून 74 रहिवाशांचा मृत्यू झाल्यानंतर अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी मुंबई पालिकेने पावले उचलली आहेत. अशी बांधकामे शोधण्यासाठी तीन नगरसेवकांच्या दिमतीला यापुढे एक अभियंता देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी दिली.

मुंबई पालिकेत 227 नगरसेवक व 24 विभाग आहेत. अनधिकृत बांधकामे शोधण्यासाठी सध्या 15 नगरसेवकांच्या दिमतीला एक अभियंता आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये अनधिकृत बांधकामच्या दिवसाला सरासरी दोन तक्रारी येत असतात. मात्र तक्रारींची संख्या अधिक असल्यामुळे त्यांचे निवारण करणे अभियंत्याला अशक्य होते. शनिवारच्या स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे सभागृह नेते यशोधर फणसे यांनी अनधिकृत बांधकामांबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी स्थायी समितीमधील सर्व पक्षांच्या सदस्यांनी शहरात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांचा पाढा वाचला. तृष्णा विश्वासराव यांनी बीपीटी, म्हाडा आणि शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात
असल्याचे सांगितले.