आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याच्यासाठी केले करवा चौथचे व्रत, त्यानेच केला अननॅचरल सेक्स केल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/भोपाळ- बॉलिवूड अॅक्ट्रेस बॉबी डार्लिंग आणि बिझनेसमन रमणीक शर्मा यांच्यातील कौंटूबीक वाद आता कोर्टात पोहोचला आहे. फॅमिली कोर्टात रमणीक शर्मा यांनी बॉबीविरोधात अननॅचरल सेक्स केल्याचा आरोप केला आहे. न्यायाधीश आर.के. वर्मा यांनी बॉबी ऊर्फ पाखी शर्माला 25 ऑक्टोबरला कोर्टात हजर राहाण्याबाबत समन्स बजावला आहे.

काय आहे हे प्रकरण?
बॉबी करते औषधी सेवन करण्‍याचा अतिरेक...
- रमणीक शर्मा यांनी बॉबी विरोधात कोर्टात खटला दाखल केला आहे. बॉबीसोबत वैवाहीक जीवन जगण्याची इच्छा असल्याचे शर्मा याने म्हटले आहे.
- कोर्टात दाखल केलेल्या दाव्यानुसार, रमणीक आणि बॉबीची भेट फेसबुकवर झाली होती.
- दोघांचे एकमेकांवर प्रेम झाले. नंतर दोघे विवाहबद्ध झाले.
- विवाहाची नोंदणी केल्यानंतर बॉबी, रमणीकपेक्षा मोठी असल्याचे समोर आले. तरीरी त्याने तिच्यासोबत लग्न केले.

कौटुंबीक हिंसाचार आणि अननॅचरल सेक्सचा गुन्हा
- बॉबी डार्लिंग ऊर्फ पाखी शर्माने नुकतीच बिझनेसमन पती रमणीक शर्माच्या विरोधात कौटुंबीक हिंसाचार आणि अनैसर्गिक सेक्सचा गुन्हा दाखल केला आहे.
-  ज्याच्यासाठी करवा चौथचे व्रत केले. आता त्यानेच अननॅचरल सेक्सचा खटला दाखल केल्याचे बॉबीने म्हटले आहे.
- बॉबीने न्यायासाठी सोशल मीडियावर हाक दिली आहे. बॉबीने 'जस्टिस फॉर बॉबी डार्लिंग' नावाने फेसबूक पेज बनवले आहे.
- फेसबूक पेजवर तिने लोकांकडे मदतीसाठी याचना केली आहे. लोकांनी तिच्या केसचा विसर पडू नये म्हणून असे केल्याचे बॉबीने म्हटले आहे.

फेसबूकवर केली अशी अपिल..
- बॉबीने फेसबूक पेजवर लिहिले, मित्रांनो प्लीज माझे पेज 'जस्टीस फॉर बॉबी डार्लिंग' ला जास्तीत जास्त लाइक करा. त्याचबरोबर माझ्या फेव्हरमध्ये कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेयर करा.
- मी माझ्या सर्व मित्र, फॅमिली मेंबर्स, फॅन्स, अपरिचित, मीडिया आणि एलजीबीटी कम्युनिटी मेंबर्सना रिक्वेस्ट करते की, मला न्याय मिळवून देण्यासाठई आणि सपोर्ट करण्यासाठी 'जस्टीस फॉर बॉबी डार्लिंग' या कॅम्पेनमध्ये सहभागी व्हा.
- बॉबीने म्हटले, तुम्ही सर्व माझी शक्ती आहात. मला माहिती आहे की तुमच्या प्रार्थनेने मला लवकरच न्याय मिळेल. सीएडब्ल्यू सेल, राणीबागने 12 सप्टेंबरला मला आणि माझ्या पतीला मिटींगसाठी बोलावले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... बॉबी डार्लिंग आणि रमणीक शर्मा यांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...