आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोटू नावाच्‍या व्‍यक्‍तीने केला पाच लाखांसाठी हेमा आणि वकिलाचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध शिल्‍पकार हेमा उपाध्याय आणि त्‍यांचे वकील हरीश भंभानी यांच्‍या हत्‍याप्रकरणात पोलिसांना महत्‍त्‍वाची माहिती मिळाली असून, 5 लाख रुपयांसाठी गोटू नावाच्‍या व्‍यक्‍तीने हा खून केल्‍याचे एका ट्रक चालकाने सांगितले. त्‍या आधारे पोलिस तपास करत आहेत. हेमा आणि त्‍यांच्‍या वकिलाचा मृतदेह शनिवारी एका नाल्‍यात आढळला होता.
कोण आहे गोटू ?
- पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हेमा ही गोटूच्‍या वेअरहाउसमध्‍येच काम करत होती. एवढेच नाही तर तिथे आपले चित्र आणि शिल्‍प ठेवत होती.
- हे वेअरहाउस चारकोपमध्‍ये आहे.
- या दोघांमध्‍ये पाच लाख रुपयांच्‍या देवाण-घेवाणीवरून वाद झाला.
- हत्‍येनंतर गोटू फरार आहे. त्‍याला पकडण्‍यासाठी पोलिसांनी तीन टीम तयार केल्‍या.
ट्रक ड्रायवरने नेमके काय सांगितले ?
- गोटूबाबत एका ट्रक चालकाने माहिती दिली.
- वृत्‍तपत्रात बातमी वाचून चालकाला जेव्‍हा याची माहिती मिळाली तेव्‍हा त्‍याने पोलिसांना ही माहिती दिली.
- त्‍याने सांगितले की, गोटू आणि त्‍याच्‍या सहका-याने ट्रकमध्‍ये कच-याचे दोन बॉक्‍स ठेवून ते नाल्‍यात फेकण्‍याचे सांगितले.
- दुस-या दिवशी जेव्‍हा या बाबत वृत्‍त वाचले तेव्‍हा त्‍यात मृतदेह असल्‍याचे कळाले. शिवाय याच ठिकाणी आरोपींनी हे बॉक्‍स फेकले होते.
- पोलिसांनी चालकासह तीन लोकांना ताब्‍यात घेतले आहे.
शुक्रवारी रात्री 8:30 वाजता मोबाइल बंद झाले
हेमा आणि त्‍यांच्‍या वकिलाचे मोबाइल शुक्रवारी रात्री 8.30 वाजता बंद झाले. त्‍यांचे शेवटचे लोकेशन चारकोप आणि कांदिवलीच्‍या दरम्‍यान होते. याच परिसरात त्‍यांचे मृतदेह आढळले.
दोन बॉक्‍समध्‍ये होते मृतदेह
कांदिवली येथील एका गटारामध्ये सफाई कामगाराला रविवारी सकाळी दोन मोठे बॉक्स आढळले. याबाबत त्याने माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बॉक्सची तपासणी केली असता त्यात दोघांचे मृतदेह आढळले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. मात्र, याबाबतचा अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. हेमा यांना गुजरात ललीत कला व राष्ट्रीय कला अकादमीचा पुरस्कार प्राप्त होता.

पुढील स्‍लाइडवर वाचा, पती चिंतनपासून घटस्फोटासाठी अर्ज.....घरात अश्लील चित्र लावल्याने झाला होता दोघांमध्ये वाद.... हेमाने पतीविरुद्ध नोंदवला होता गुन्हा....बघा या बॉक्समध्ये सापडले मृतदेह...