(फोटोओळ - शिवसेना प्रमुख बाळ ठाकरेसोबत सुहास खामकर)
मुंबई - बॉडी बिल्डिंगमध्ये 'भारत श्री' आणि 'आशिया श्री' सारखे मोठमोठे पुरस्कार प्राप्त करणारा सुहास खामकरला 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहे. बॉडी बिल्डिंगमध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्यामुळे सुहासला पनवेलचा नायब तहसिलदार पदी नियुक्त केले होते.
भ्रष्ट्राचार निर्मूलन समितीने दिलेल्या माहितीनुसार एका जमीनीच्या प्रकरणामध्ये संबधित व्यक्तीचे नाव सरकारी दस्तऐवजात समाविष्ट करण्यासाठी त्याने लाच मागितली होती. भ्रष्ट्राचार निर्मुलन समिती (एबीसी) ने सोमवारी सुहास आणि त्याच्या सहका-याला रंगेहात पकडले.
कित्येक वेळेस जिंकले किताब
सुहास नऊ वेळेस 'भारत श्री' चा किताब जिंकला आहे. त्याशिवाय मिस्टर आफ्रिका 2010, मिस्टर ओलम्पिया, सात वेळ मिस्टर महाराष्ट्र आदी किताब जिंकले आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, सुहासची छायाचित्रे