आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुहास खामकरला पोलिस कोठडी, षडयंत्र करून गोवल्याचा सुहासचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- सुहास खामकर आपले शरीर सौष्ठव दाखवताना...)
मुंबई- नायब तहसीलदार व शरीरसौष्ठव सुहास खामकर यांना आलीबाग सेशन कोर्टाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पनवेलमध्ये नायब तहसीलदार म्हणून काम करणाऱ्या सुहास खामकरच्या सहाय्यकाला सोमवारी दुपारी चार वाजता 7/12 उता-यावर नोंद करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. दरम्यान, आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगत आपल्याला पद्धतशीरपणे गोवण्यात आल्याचे खामकर याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भ्रष्‍ट्राचार निर्मूलन समितीने दिलेल्‍या माहितीनुसार एका जमीनीच्‍या प्रकरणामध्‍ये सं‍बधित व्‍यक्‍तीचे नाव सरकारी दस्‍तऐवजात समाविष्‍ट करण्‍यासाठी त्‍याने लाच मागितली होती. भ्रष्‍ट्राचार निर्मुलन समिती (एबीसी) ने सोमवारी सुहास आणि त्‍याच्‍या सहका-याला रंगेहात पकडले होते. या घटनेबाबत माहिती देताना सुहास म्हणाला, लाचखोरी प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. हे माझ्याविरोधातील रचलेले षडयंत्र असून यामध्ये मला पद्धतशीरपणे गोवण्यात आले आहे. प्रसारमाध्यमातील लाच घेतल्याचे वृत्त चुकीचे व दिशाभूल करणारे आहे. मी आजपर्यंत देशासाठी खेळलो व यापुढेही खेळत राहणार आहे. लाचखोरीसारख्या प्रकरणात गोवले तर मी संपेन असे जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. याउलट मी अधिक जोमाने काम करेन व महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्ज्वल करेन. मला गोवण्याचा हा प्रकार चुकीचा असून हे माझाविरुद्ध रचलेले षडयंत्र आहे असे सुहासने पत्रकारांना सांगितले.