बॉडी बिल्डिंगमध्ये 'भारत श्री' आणि 'आशिया श्री' सारखे उल्लेखनीय पुरस्कार प्राप्त करणारा सुहास खामकरला 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले हाते. बॉडी बिल्डिंगमध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्यामुळे सुहासला पनवेलच्या नायब तहसिलदार पदी नियुक्त केले होते. मात्र या पदाचा गैरफायदा घेत खामकरने भ्रष्टाचार केल्याचा आरोप भ्रष्ट्राचार निर्मुलन समिती (एबीसी) केला. सुहास खामगार पुन्हा बॉडी बिल्डिंगमध्ये इतिहास रचण्यासाठी 'मिस्टर वर्ल्ड' स्पर्धेसाठी ब्राझीलला जाणार आहे.
50 हजार रूपयांची लाच घेतल्यामुळे त्याच्या घराची झडती घेण्यात आली होती. भ्रष्ट्राचार निर्मूलन समितीने दिलेल्या माहितीनुसार एका जमीनीच्या प्रकरणामध्ये संबधित व्यक्तीचे नाव सरकारी दस्तऐवजात समाविष्ट करण्यासाठी त्याने लाच मागितली होती. भ्रष्ट्राचार निर्मुलन समिती (एबीसी) ने सुहास आणि त्याच्या सहका-याला रंगेहात पकडले होते.
अनेकवेळा जिंकले पुरस्कार-
सुहास खामकर याने 9 वेळा ' भारत श्री' पुस्कार पटकावला आहे. यांनतर 2010 मध्ये 'मिस्टर अफ्रीका' हा पुरस्कार प्राप्त केला. याबरोबच ' 7 वेळा महाराष्ट्र श्री' पुरस्कार प्राप्त केला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, बॉडी बिल्डर सुहासची निवडक छायाचित्रे...