आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bogus Advertising About Recruitment In Mumbai Metro

मुंबई मेट्रो भरतीसाठी पुन्हा बोगस जाहिराती, ग्रामीण भागातील तरुणांना केले लक्ष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बेरोजगारांची नोकरीची निकड लक्षात घेऊन त्यांना फसवण्याचे विविध प्रकार नेहमी समोर येत असतात. केंद्राच्या एका योजनेमध्ये कशा प्रकारे तरुणांची फसवणूक केली जात आहे त्याबाबतचे वृत्त काही महिन्यांपूर्वी "दिव्य मराठी'ने दिले होते. या बातमीतही इच्छुकांकडून रक्कम मागण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले होते. आता मुंबईतील मेट्रोमध्ये नोकरी देण्याचे आमिष ग्रामीण भागातील तरुणांना दाखवून इच्छुकांकडून १० हजार ५०० रुपये वसूल केले जात असल्याचे उघडकीस आले आहे.
एमएमआरडीएने याची गंभीर दखल घेऊन सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती एमएमआरडीएचे महाव्यवस्थापक (एचआर) दिलीप कवठकर यांनी दिली. गेल्या वर्षीही सप्टेंबरमध्ये अशा बोगस जाहिराती आल्या होत्या.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना दिलीप कवठकर यांनी सांगितले, प्राधिकरणाच्या नावाने आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये प्रशासकीय पदांची भरती करण्यासाठी खोट्या आणि बनावट जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. या जाहिरातींमध्ये एमएमआरडीएचा बनावटी लोगो आणि चुकीचा पत्ता लिहिण्यात आलेला आहे. एवढेच नव्हे तर या जाहिरातींमधून इच्छुकांकडून १० हजार ५०० रुपयांची मागणीही करण्यात येत आहे.

ज्यांनी जाहिराती दिल्या आहेत त्यांनी मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट अशा हेडिंगखाली तीन सिंहाचा लोगोही वापरला आहे. आम्ही माहिती घेतली असता काही तरुणांना नेमणूक पत्रेही दिल्याचे आढळले. जाहिरातींमध्ये देण्यात आलेला ईमेल आयडी मुंबई मेट्रो एमएमआरडीए ११ हा जीमेल आयडी दिलेला आहे जो अनधिकृत आहे.

ऑनलाइन पैसे भरण्यास सांगितले
कवठकर यांनी सांगितले, १८, २० आणि २० जून रोजी आम्ही विविध पदांसाठी तीन जाहिराती दिल्या होत्या. त्यानुसार अर्जदारांनी ४०० रुपये तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी अर्जदारांकडून १०० रुपये ऑनलाइन भरण्यास सांगितले होते. कॉम्प्युटर बेस्ड अॅसेसमेंट टेस्ट घेणार आहोत अशाच अर्जदारांनी ही फी भरावयाची आहे. तरुणांची फसवणूक होऊ नये म्हणून वांद्रे-कुर्ला आणि सायबर गुन्हे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.