आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bogus Caste Certificate Holders Now Facing Action

बोगस जात प्रमाणपत्रे देणा-यांवर होणार कारवाई, सामाजिक न्याय विभागाचा आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नोकरी किंवा निवडणुकांमधील उमेदवारीसाठी आरक्षित जागा पदरात पाडून घेण्यासाठी बोगस जात व पडताळणी प्रमाणपत्रे सादर करणा-यांना आता लवकरच न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अशी बोगस प्रमाणपत्रे देणा-यांवर खटले भरण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत.


खासगी नोक-यांपेक्षा सरकारी नोक-या, नोकरीत बढती व निवडणुकीत फायदा करून घेण्यासाठी अनेकांनी बोगस जात प्रमाणपत्राचा वापर केला आहे. अशी बोगस प्रमाणपत्रे दिलेले अनेक कर्मचारी सरकारी विभागांमध्ये कार्यरत आहेत. अशा सर्वांची अनेक वर्षे सेवा झालेली असल्याने त्यांच्यावर कारवाई करणेही राज्य सरकारला अवघड होऊन बसले आहे. मात्र, यापुढे असे प्रकार होऊन मागासवर्गीयांचे हक्क डावलले जाऊ नयेत यासाठी सामाजिक न्याय विभागाने न्यायालयात खटले दाखल करण्याचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.


मागासवर्गीयांना, आर्थिक दुर्बलांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून काही सामाजिक संघटनांनी आंदोलने केली. जात पडताळणी प्रमाणपत्रे घेण्याची सक्ती केल्यानंतरही काही कर्मचा-यांनी जात पडताळणी विभागात सेटिंग करून बोगस जात पडताळणी प्रमाणपत्रे प्राप्त केल्याचेही स्पष्ट झाले आहे. अनेकांनी अशी प्रमाणपत्रे सादर करून सरकारी नोक-या लाटल्याचे उघडकीस आले. यामध्ये काही उच्चपदस्थ अधिकारीही आहेत.