आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटात कामाचे अामिष दाखवून फसवणूक; अाराेपीला जामीन नाहीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुलांनाचित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना ६५ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला.
न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. विलास वाघमारे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील संगीता शेटे यांनी वाघमारेविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. वाघमारे आणि त्याची पत्नी रेश्मा यांनी मुलांना चित्रपटात काम देण्याचे सांगून त्यांच्या पालकांकडून सुमारे ६५ लाख रुपये घेतले. मात्र, कोणालाही चित्रपटात काम दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संगीता यांच्यासह अनेकांनी वाघमारे दांपत्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...