आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bogus Doctor Issue In Maharashtra, Two Doctor Notice By Mmc At Buldhana

बोगस एमडी डॉक्टरांचे पितळ उघडे पाडणार; बुलडाण्यात दोघांना नोटिसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विदेशात ‘एमडी’ पदवी घेतल्याचे सांगत राज्यात प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) फास आवळण्यास सुरुवात केली आहे. बोगस पदवीच्या आधारे रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा डॉक्टरांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ‘एमएमसी’चे अध्यक्ष डॉ. किशोर तावरी यांनी दिला अाहे.
विदेशातील बाेगस पदवीच्या अाधारे बालराेगतज्ज्ञ, स्त्रीराेगतज्ज्ञ यासारखी ‘बिरुदावली’ लावून प्रॅक्टिस करणारे अथवा ‘अायसीयू’ चालवणारे सुमारे ६०० डाॅक्टरांची राज्यात ‘दुकानदारी’ चालू असल्याचे ‘एमएमसी’ने केलेल्या चाैकशीत समाेर अाले अाहे. त्यांच्या या पदव्यांना भारतीय वैद्यकीय परिषदेकडून काेणतीही मान्यता देण्यात अालेली नाही. त्यामुळे हे डाॅक्टर ‘एमडी’ पदवी लावण्यास किंवा त्या अाधारे रूग्णांवर उपचार करण्यास पात्र ठरत नाहीत. अशा डाॅक्टरांची शाेधमाेहिम करून त्यांच्यावर कडक कारवाईसाठी पाऊले उचलली जात अाहेत,’ असे डाॅ. तावरी यांनी सांगितले.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील डाॅ. राजेंद्र राजगुरू व डाॅ. पंजाब शेजवळ हे दाेन डाॅक्टर विदेशात ‘एमडी’ पदवी घेतल्याचे सांगून ‘एक्स्पर्ट’ म्हणून रुग्णांवर उपचार करत असल्याची तक्रार वैद्यकीय परिषदेकडे अाली अाहे. त्यानुसार या डाॅक्टरांना नाेटीस बजावण्यात अाली अाहे. ‘अापल्याकडील ‘एमडी’चा उल्लेख असलेले लेटरहेड्स व इतर स्टेशनरी तातडीने जाळून टाकावी व या पदवीच्या नावाखाली रुग्णांची चालवलेली हेळसांड बंद करावी,’ असा इशारा या नाेटिशीद्वारे देण्यात अाला अाहे. हा प्रकार बंद न झाल्यास या दाेघांवरही तातडीने कारवाई करण्यात येईल,’ असे डाॅ. तावरी यांनी सांगितले.

तज्ज्ञ असल्याचा दावा करत रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा डाॅक्टरांविराेधात राज्यभर माेहीम हाती घेण्यात येणार अाहे. त्याची सुरुवात विदर्भातून करण्यात अाली असल्याचेही डाॅ. तावरी म्हणाले.
पदवीच्या कार्यकाळात ‘पदव्युत्तर’ कसे?
भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रम साडेचार वर्षांचा अाहे व त्यांना एक वर्षाची इंटर्नशिप करावी लागते. तसेच पदव्युत्तरसाठी (एमडी) अाणखी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागताे. मात्र, विदेशातील खासगी विद्यापीठांत चार ते पाच वर्षांत ‘एमडी’ पदवी दिली जाते. ही पदवी अापल्या देशातील ‘एमबीबीएस’च्या बराेबरीची अाहे. त्यामुळे विदेशात शिक्षण घेतले असले, तरी या डाॅक्टरांना ‘एमडी’ ही पदवी लावण्याचा काेणताही अधिकार नाही, असे डाॅ. तावरी यांनी स्पष्ट केले.