आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाेगस अाैषधांचा दीड कोटीचा माल जप्त, ९४ ठिकाणी छापे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आकर्षक जाहिरातीच्या माध्यमातून हानीकारक व आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या औषधांच्या बोगस जाहिरातींची दखल घेत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने राज्यभर कारवाई करत सुमारे एक कोटी ५२ लाख रुपयांची २६३ प्रकारची औषधे जप्त केली.

मानसिक आजार, मधुमेह, लठ्ठपणा, लैंगिक कार्यक्षमता, उंची वाढविण्याचा दावा करणारे, स्त्रियांचे आजार, कॅन्सर आणि संधिवात बरा करण्याचा दावा करणाऱ्या औषधांच्या आक्षेपार्ह जाहिरातींविरोधात कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. त्यानुसार या कार्यालयाने विशेष मोहीम राबवत राज्यातील विविध ९४ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये मुंबईत २६ ठिकाणी छापे टाकून ६७ प्रकारची औषधे जप्त केली. कोकण विभागात २२ छाप्यांत ६० प्रकारची उत्पादने, पुणे विभागातील १५ छाप्यांत १५ उत्पादने, नाशिक विभागातील ११ छाप्यांत १५ उत्पादने, औरंगाबादमध्ये अाठ छापे टाकून ४५ उत्पादने, अमरावतीमध्ये सहा छाप्यांत १३ उत्पादने, नागपूरमध्ये सहा छाप्यांत ४८ प्रकारची उत्पादने जप्त करण्यात आली.

शुगर लॉक सिरप, अभय मेदारी स्लिम फिट कॅप्सूल, फॅटगो कॅप्सूल, व्ही-स्लिम कॅप्सूल, ३०३ कॅप्सूल, शुगर नाशक वटी, माय फेअर क्रीम, आरव्ही कॅप्स, डायमेडिका प्युअर आयुर्वेदिक प्रॉडक्ट, अश्वतुल-डीएक्स कॅप्सूल, लाँग हाइट एक्स्ट्रा स्ट्राँग कॅप्सूल, फॅट क्यूअर रस, लूक लाइक १६ आदी विविध प्रकारच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ नुसार कारवाई करण्यात येत आहे. या कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती कायद्यात नमूद ५४ आजार व व्याधी यांचे निदान करणे, हे आजार बरे करणे, व्याधी क्षमविणे, उपचार व प्रतिबंध करणे या विषयीच्या औषधाच्या जाहिरातीमध्ये भाग घेऊ शकत नाही. अशा जाहिरातींवर यापुढेही कारवाईचा इशारा देण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...