मुंबई- दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चारा छावण्यांमधील जनावरांची संख्या वाढवून दाखवायची आणि त्या बदल्यात अनुदान लाटायचे, असा प्रकार घडला आहे.
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त २७४ चारा छावण्यांमध्ये लाख, १० हजार जनावरे होती. मात्र यापैकी ४३ हजार, ५७१ जनावरे बोगस दाखवण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीचे निर्देश देताना १२५ कोटींचे अनुदान तत्काळ थांबवण्याचेही आदेश िदले आहेत.
दुष्काळात शेतकऱ्यांची जनावरे जगवण्यासाठी त्यांना चारा, पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारतर्फे मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चारा छावण्या भाजपासह विविध पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या संस्थांनी सुरू केल्या. चारा छावणी चालवण्यासाठी चालकाला प्रत्येक मोठ्या जनावरामागे ७० रुपये, तर लहान जनावरामागे ३५ रूपये अनुदान िमळते. हेच अनुदान लाटण्यासाठी चारा छावण्यातील जनावरांचा आकडा फुगवून दाखवण्यात आला. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर छावण्याची तपासणी सुरू झाली. छावण्यांची तपासणी सुरू होताच छावण्यांमधील जनावरांची संख्याही कमी व्हायला लागली.
दुष्काळात सगळ्यात जास्त चारा छावण्या बीड जिल्ह्यातील आष्टी आणि बीड तालुक्यात सुरू करण्यात आल्या होत्या. आष्टी तालुक्यात २०१२ साली असलेल्या जनावरांची संख्या होती लाख, २४ हजार, ५१० आणि दुधाचे संकलन होते ४१ हजार िलटर. तर, २०१६ साली आष्टी तालुक्यात छावण्यांमधील जनावरांची संख्या आहे लाख, २८ हजार, ७७२ आणि दुधाचे संकलन आहे फक्त २८ हजार.
तपासणीत संख्या घटली
चारा छावण्यांमधील जनावरांची आकडेवारी १२ मेनंतर तपासली जाऊ लागल्यानंतर छावण्यांमधील जनावरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. आष्टी तालुक्यात ११ मे २०१६ रोजी जनावरांची संख्या होती लाख, २८ हजार ७७२. ३१ मे २०१६ रोजी यात घट होऊन ती झाली लाख, ११ हजार ३३६. म्हणजेच एकट्या आष्टी तालुक्यात १७ हजार,४३६ जनावरे बोगस दाखवण्यात आली होती.
बीड तालुक्यात ११ मे २०१६ रोजी चारा छावण्यांमधील जनावरांची संख्या होती लाख, हजार, ७१८. मात्र ३१ मे रोजी चारा छावण्यांमधील जनावरे तपासली असता ८१ हजार, ७३३. म्हणजे बीड तालुक्यातील १९ हजार, ९८५ जनावरे बोगस दाखवण्यात आली होती. केज तालुक्यात ११ मे २०१६ रोजी चारा छावण्यांमधील जनावरांची संख्या होती २१ हजार ९२६. मात्र ३१ मे रोजी तपासणी केली असता फक्त १५ हजार ७७६ जनावरे आढळून आल्याने हजार, १५० जनावरे बोगस दाखवण्यात आली आहेत.
जनावरे वाढली; दूध उत्पादन घटले
एकतर मागील सलग चार वर्ष मराठवाड्यात दुष्काळ आहे. त्यामुळे दुष्काळात जनावरांची संख्या घटायला हवी होती. तर दुसरीकडे जनावरांची संख्या वाढल्यानंतर दुध संकलनही वाढायला हवे होते. ते कमी कसे झाले? हा विरोधाभास लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी केली असताना आष्टी तालुक्यातील चारा छावण्यांतील जनावरांची संख्या अनुदान लाटण्यासाठी वाढवून दाखवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)