आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bohra Community Religious Teacher Sayyadana Burhanuddin Died

बोहरा समाजाचे धार्मिक गुरू सय्यदना बुर्‍हानुद्दीन यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दाऊदी बोहरा समाजाचे 52 वे धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहंमद बुर्‍हानुद्दीन (102) यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. बोहरा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
डॉ. सय्यदना यांचा जन्म गुजरातमधील सुरत येथे झाला. त्यांचे वडील सय्यदना तहेर सैफुद्दीन यांचे निधन झाल्यानंतर 1965 मध्ये ते धर्मगुरू झाले. त्यांनी गोरगरिबांसाठी चर्नी रोड येथे सैफी रुग्णालय व भेंडी बाजाराच्या पुनर्विकासाचा मोठा प्रकल्प राबवला.
डॉ. सय्यदना यांची ‘नमाज-ए-जनाजा’ भेंडीबाजारातील सैफिना मशिदीत होणार असून तेथील बोहरा समाजाच्या कब्रस्तानात त्यांचा दफनविधी होईल. त्यास भारतासह 40 देशांतील हजारो दाऊदी बोहरा समाजबांधव उपस्थित असणार आहेत.