आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Acshay Kumar Commented On Amirs Tolerance intolerance Comment

अक्षयचे टिकास्त्रः चढउतार येतच असतात,आमिरने असे बोलायला नको होते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ जयपूर- असहिष्णुतेच्या मुद्द्यावर अभिनेता आमिर खानच्या देश सोडून जाण्याच्या वक्तव्यावर अभिनेता अक्षयकुमारने टीकास्त्र सोडले आहे. प्रत्येक देशात चढउतार येतच असतात. मात्र कोणीही अशा प्रकारची भडक विधाने करणे सुरू करायला नको. अशा घटना होतच असतात; परंतु दुर्दैवाने आम्ही चुकीच्या घटनाच उचलून धरतो, असे अक्षयकुमार म्हणाला.

दादरीमध्ये घडलेले हत्याकांड आणि दलित- अल्पसंख्यांकांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर देशभर असहिष्णुतेच्या मुद्यावर चर्चा सुरू होऊन साहित्यिक, विचारवंत व शास्त्रज्ञांनी पुरस्कार वापसी सुरु केली होती. त्यातच नोव्हेंबरमध्ये पत्नी किरण रावने देशातील घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडून जायला हवे, असे म्हटल्याचे विधान केल्यामुळे आमिर खान वादात अडकला होता. अक्षयच्या विधानानंतर आमिर खानने रंग दे बसंती या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित समारंभात स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, चित्रपट उद्योगातील अनेकांनी घाईघाईने असहिष्णुतेचा मुद्दा उचलला. असे करणे नादानपणाचे होते. त्या मुद्द्यावर मी त्यांचे समर्थन करत नाही, असेही सिन्हा म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आता काय म्हणतो अमिर...