आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयकुमार घेणार यवतमाळचे गाव दत्तक; शेतकऱ्यांच्या पत्नींना अाधार देणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून अालेला बाॅलीवूड अभिनेता अक्षयकुमारने अाता यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी अात्महत्या झालेले एक गाव दत्तक घेण्याचा मनाेदय जाहीर केला अाहे. केवळ अार्थिक मदत करता या गावातील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना राेजगाराचा ‘अक्षय’ अाधार देण्याचा एक प्रयत्न या अभिनव उपक्रमातून करण्यात येणार अाहे.

दुष्काळाने हाेरपळलेल्या मराठवाड्याला सावरण्यासाठी सरकारसह अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींनी गेल्या वर्षी भरभरून अार्थिक मदत केली. बाॅलीवूड अभिनेता अक्षयकुमारनेही सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करत उस्मानाबाद जिल्ह्यातील अात्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजारांची मदत केली. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांची निवड करून त्यांना धनादेशाच्या माध्यमातून पैसे थेट त्यांच्या बँकेत जमा केले. ही अार्थिक मदत तात्कालिक राहता प्रत्येक महिन्याला ताे पंधरा ते वीस शेतकऱ्यांना अाजही अार्थिक मदत पाेहोचवत अाहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबराेबर साेमवारी झालेल्या भेटीत अक्षयकुमार याने आर्थिक मदतीच्या पलीकडे जाऊन काही तरी करण्याची इच्छा व्यक्त केली.

या भेटीसंदर्भात अधिक तपशील देताना मुनगंटीवार म्हणाले की, ‘अागामी काळात राज्यातल्या शेतकऱ्यांवर अात्महत्येची वेळ येऊ नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू अाहेत. विशेषकरून अात्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना त्यांच्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने त्यांना राेजगार उपलब्ध करून देण्याची गरज अाहे. त्यांना अावश्यक ते प्रशिक्षण देण्याची अावश्यकता अाहे. या प्रस्तावावर साेमवारी अक्षयकुमार यांच्याशी ढाेबळ चर्चा झाली. सर्वात जास्त शेतकरी अात्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील गाव दत्तक घेऊन येथील विधवा पत्नींना राेजगार उपलब्ध करून देण्याबाबत अक्षयकुमार यांनी तत्त्वत: मंजुरी दिली अाहे. त्यानुसार अाता या गावाची लवकरच निवड करण्याबाबत िजल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात अाले अाहे. लवकरच याबाबतची तपशीलवार याेजना तयार करण्यात येणार अाहे. ही याेजना यशस्वी झाल्यास अन्य जिल्ह्यांतही ती राबवण्यात येईल,’ असेही मुनगंटीवार म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...