आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर, शाहरुख यांच्या सुरक्षेत कपात नाही, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता आमिर खान, शाहरुख खान यांच्यासह ४० सेलिब्रिटींच्या सुरक्षेमध्ये कोणतीही कपात करण्यात आली नसल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी शुक्रवारी टि्वटरवरून केला. दरम्यान, या अभिनेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसभर सुरू होती. त्यामुळे या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

बॉलीवूडमधील एकूण ४० सेलिब्रिटींना पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात येते. मात्र, त्यापैकी १५ जणांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. शाहरुख, आमिरच्या सुरक्षेबरोबरच विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी, फराह खानसह इतरांची सुरक्षा काढण्यात आल्याची चर्चा होती.
बातम्या आणखी आहेत...