आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Dara Singh Is Death At Mumbai. Dara Singh Article By Publish In The Don At Pakistan

पहेलवान दारा सिंग यांना पाकिस्‍तानात श्रद्धांजली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कुस्तीच्या आखाड्यात एकदाही न हारलेला कुस्तीवीर आणि बॉलिवुडचे ज्येष्‍ठ अभिनेते दारा सिंग यांना पाकिस्तानातही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 'आखिरी मुकाबला हार गए दारा सिंग' या शिर्षकाखाली 'डॉन' या वृत्तपत्रात दारा‍ सिंगांवरील श्रद्धांजलीपर लेख प्रसिद्ध झाला आहे. दारा सिंग यांची एक इच्छा अपूर्ण राहिल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. '
'डॉन'मधील वृत्तनुसार, पाकिस्‍तानातील प्रसिद्ध पहेलवान भोलू विरोधात कुस्तीच्या आखाड्यावर दोन हात करण्याची दादा सिंग यांची इच्छा होती. परंतु दारा सिंग यांचे निधन झाल्यामुळे ती अपूर्ण राहिली आहे. दारा सिंग यांनी पाकिस्‍तानचा प्रसिद्ध कुस्तीवीर टायगर आजाद याला कुस्तीच्या आखाड्यात धूळ चाटवली होती. यूपीमधील कुशीनगरातील पडरणामध्ये 1979मध्ये ही कुस्ती स्पर्धा झाली होती. दारा सिंग यांनी पाकिस्तानी कुस्तीवीर टायगर आजाद याच्या नाकी नऊ आणले होते.
रुस्तम-ए-हिंद दारा सिंग यांचे गुरुवारी सकाळे साडेसात वाजता निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. दुपारी साडेचारच्या सुमारास विले पार्ले येथील स्मशानभूमिवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्‍यात आले. दारा सिंग यांना 7 जुलै रोजी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना व्हॅटिंलेटरवर ठेवण्यात आले होते.
दारासिंग आता काही तासांचेच सोबती असल्याचे बुधवारी रात्री डॉक्टरांनी स्पष्‍ट केले. त्यानंतर रात्री साडेदहाला त्यांना घर नेण्यात आले होते. अखेरचा काळ त्यांनी कुटुंबियांसोबत घालवावा, म्हणून हा निर्णय घेण्यात आला होतदारासिंग यांचे जळगावकरांशी अनोखे ऋणानुबंध
दारा सिंग हे एक उमदे व उत्तुंग भारतीय व्यक्तिमत्त्व गमावले- अमिताभ बच्चन
PHOTOS : सिनेअभिनेत्यांनी दिला दारा सिंग यांना अखेरचा निरोप...
दारा सिंग यांना नाही दिसले मुमताजचे प्रेम !