आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राण यांच्या प्रकृतीत सुधारणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते प्राण यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी सांगितले. प्राण यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे 25 डिसेंबर रोजी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्राण अद्यापही हॉस्पिटलमध्येच असून त्यांची प्रकृती गंभीर नाही, असे त्यांची मुलगी पिंकीने सांगितले. रुग्णालयात त्यांची नियमित तपासणी केली जात आहे, काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या वर्षी दिवाळीनंतर प्राण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांना काही दिवसांनंतर रुग्णालयातून अल्पावधीत सुटी देण्यात आली.