आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Sanjay Dutt Caught With Weapons In Mumbai

बाळासाहेबांच्या एका फोनवर तुरूंगातून बाहेर आला होता संजूबाबा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्त याने 'मातोश्री'वर जाऊन बाळासाहेबांचा आर्शीवाद घेतला होता. यावेळी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त उपस्थित होते.)

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज, 23 जानेवारीला जयंती आहे. बाळासाहेब ठाकरेंचा जन्म 1926 मध्ये महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला होता. संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणासह मुंबईतील मायानगरीवर बाळासाहेबांचा दबदबा होता. मुंबईत पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला खेळू देणार नाही, अशी वल्गनाही त्यांनी केली होती. एवढेच नाही तर एका नेत्याने खेळपट्टीही उखडली होती. बाळासाहेबांच्या एका फोनवरून बॉलिवूड अभिनेता संजय दत्त तुरुंगातून बाहेर आला होता.

1992 मध्ये मुंबईत दंगल उसळली होती. या काळात अभिनेता संजय दत्तच्या घरात AK47 रायफल सापडली होती. पोलिसांनी संजय दत्तला जेरबंद केले होते. संजयविरोधात देशद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. अखेर संजय दत्तचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांना बाळासाहेबांची मदत घ्यावी लागली होती. संजूबाबा तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सुनील दत्त हे बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले होते.

संजूबाबात तुरूंगातून थेट मातोश्रीवर पोहोचला होता...
तुरूंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्त वडिलांसोबत 'मातोश्री'वर पोहोचले होते. संजयने बाळासाहेबांचा आर्शीवाद घेतला होता. दरम्यान, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सद्यस्थितीत संजय दत्त पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांवर आधारित ‘बाळकडू’ या मराठी सिनेमाचा गुरुवारी ग्रॅंड प्रीमियर शो आयोजित करण्‍यात आला आहे. लोअर परळच्या फिनिक्स ‘पीव्हीआर’मध्ये सायंकाळी साडेसहा वाजता मराठी सिनेसृष्टीतील पहिलाच ‘रेड कार्पेट’ सोहळा रंगणार आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांसह मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, बाळासाहेब ठाकरे आणि संजय दत्तचे निवडक PHOTO