आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Sanjay Dutt Pharlo Leave Granted

तुरुंगाच्या गेटवरून संजूबाबाची "घरवापसी', अर्जाबाबतच्या घोळाचा संजय दत्त याला फायदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त फर्लो रजा संपल्याने गुरुवारी तुरुंगात आत्मसमर्पण करण्यासाठी घरातून बाहेर पडला, परंतु सुटी वाढवण्याच्या त्याच्या अर्जावर तुरुंग प्रशासन व पोलिस अधिकाऱ्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत समन्वय होऊ शकला नाही. त्याचा फायदा त्याला झाला व संजूबाबा तुरुंगाच्या गेटवरून आल्यापावली घरी परतला.
वकील हितेश जैन यांनी सांगितले की, संजय दत्त दुपारी पुण्याच्या तुरुंगात पोहोचला होता, परंतु गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी त्याच्या सुटीच्या अर्जावर अद्याप निर्णय झाला नसल्याने त्याने आत्मसर्पण करण्याची गरज नसल्याचे सांगितले. संजय दत्तला २४ डिसेंबरला त्याला १४ दिवसांची सुटी मंजूर झाली होती. त्यानंतर त्याने २७ डिसेंबरला सुटी वाढवण्यासाठी अर्ज दिला होता. शिंदे यांच्या वक्तव्याच्या आधारे संजय दत्तच्या वतीने तुरुंग प्रशासनाला नव्याने अर्ज सादर करण्यात आला. त्यात म्हटले होते की, पुढील २४ तासांत त्याच्या अर्जाबाबत स्थिती न स्पष्ट झाल्यास तो शुक्रवारी शरण येण्यास तयार आहे. अर्थात यावरून वाद वाढत गेल्यानंतर गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी त्यांच्या वक्तव्याचा इन्कार केला.

सुटीवर घोळ कुठे?
तुरुंग प्रशासन व पोलिस अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने हा घोळ झाला. पुण्याचे तुरुंग महानिरीक्षक राजेंद्र धामणे म्हणाले, संजयने प्रकृती अस्वास्थ्याच्या आधारे सुटी वाढवण्यासाठी अर्ज दिला होता. याबाबत वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी मुंबई पोलिसांना पत्र लिहिले होते. परंतु काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे अर्जावर आम्हालाही निर्णय घेता आला नाही. अर्थात मुंबईच्या सर्व ९३ पोलिस ठाण्यांच्या इनचार्जसह पोलिस आयुत धनंजय कळमकर यांनी, आम्हाला पुणे तुरुंग प्रशासनाचे पत्रच मिळाले नाही,ह्ण असा दावा केला.