आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Actor Shaharukh Khan\'s Chennai Express Movie Issue In Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'दुनियादारी\' Vs \'चेन्नई एक्स्प्रेस\' वाद मिटला; दोन्ही चित्रपट दाखवण्यावर एकमत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठी च‍ित्रपट 'दुनियादारी' विरुद्ध 'चेन्नई एक्स्प्रेस' हा वाद महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मध्यस्थीने मिटला. 'दुनियादारी' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस' हे दोन्ही चित्रपट दाखवण्यावर एकमत झाले आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस'चे दिग्दर्शक रोहीत शेट्टी टीमने 'कृष्णकुंज'वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत या वादावर तोडगा काढण्यात आला. यावेळी 'दुनियादारी'ची टीमही उपस्थित होती.

मुंबईतील सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमधून 'दुनियादारी' चित्रपट काढल्यास शाहरुखचा 'चेन्नई एक्स्प्रेस' प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी 'चेन्नई एक्स्प्रेस'चे दिग्दर्शक रोहीत शेट्टी यांच्यासह त्यांच्या टीमने राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही चित्रपट दाखवण्यावर एकमत झाले.

मुंबईतील सिंगल स्क्रीनमधून 'दुनियादारी' काढण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेने त्याविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर 'चेन्नई एक्स्प्रेस'ची टीम खडबडून जागी झाली होती.

दरम्यान, येत्या 8 ऑगस्टला प्रदर्शित होत असलेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस'साठी मुंबईतील सिंगल स्क्रीनमधून 'दुनियादारी' हा मराठी चित्रपट हटवला तर संपूर्ण राज्यात 'चेन्नई एक्स्प्रेस' प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा अमेय खोपकर यांनी बुधवारी दिला होता. मनसे स्टाईलने 'चेन्नई एक्स्प्रेस'ला विरोध केला जाईल, असेही खोपकर यांनी सांगितले होते.